संभाजी नगर (औरंगाबाद) येथील एन-९, एल-सेक्टर, जळगाव रोड या परिसरात श्री रेणुका मातेच्या
संचाराची/अस्तित्वाची जाणीव येथील काही रहिवाशांना साधारणपणे १९८३-८४ च्या सुमारास
झाली आणि १९८४ च्या चैत्र शुद्ध पोर्णिमा शके १९०६ १५ एप्रिल १९८४ रक्ताश्री नाम संवत २०४० या दिवशी श्री रेणुका माता मंदिर अस्तित्वात
आले. मंदिरातील श्री रेणुका मातेची मूर्ती गुरुवर्य परमपूज्य अण्णामहाराज यांनी
स्वहस्ते तयार केले असून त्यांच्याच शुभ हस्ते कार्तिक शुद्ध पोर्णिमा शके १९११ वार
शनीवार दिनांक ११ नोव्हेंबर १९८९ शुक्ल नाम संवत २०४६ या दिवशी प्राणप्रतिष्ठा सोहळा
संपन्न झाला. हे अत्यंत जागृक देवस्थान आहे श्री रेणुका मातेचे उपासना करताना अनेक भक्तांना
याची प्रचाती आली आहे