मंदिराचा इतिहास
     संभाजी नगर (औरंगाबाद) येथील एन-९, एल-सेक्टर, जळगाव रोड या परिसरात श्री रेणुका मातेच्या संचाराची/अस्तित्वाची जाणीव येथील काही रहिवाशांना साधारणपणे १९८३-८४ च्या सुमारास झाली आणि १९८४ च्या चैत्र शुद्ध पोर्णिमा या दिवशी श्री रेणुका माता मंदिर अस्तित्वात आले, १९ ऑगष्ट १९८५ या दिवशी श्री रेणुका माता सार्वजनिक विश्वस्त निधी मंडळाची नोंदणी त्यावेळचे धडाडीचे कार्यकर्ते कै. प्रकाश गंगाधरराव खोत यांच्या अध्यक्षते खाली झाली. कै. भावसिंग किसनसिंग बैनाडे यांनी देखील मंदिर उभारणी मध्ये मोलाचा वाटा उचलला.

     मंदिरातील श्री रेणुका मातेची मूर्ती गुरुवर्य परमपूज्य अण्णामहाराज यांनी स्वहस्ते तयार केले असून त्यांच्याच शुभ हस्ते कार्तिक शुद्ध पोर्णिमा शके १९११ वार शनीवार दिनांक ११ नोव्हेंबर १९८९ या दिवशी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला

     हे अत्यंत जागृक देवस्थान आहे श्री रेणुका मातेचे उपासना करताना अनेक भक्तांना याची प्रचाती आली आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हनजे या मंदिरातील देवीचा कोणाच्याहि अंगात संचार होत नाही. येथे जीव/पशु हत्या होत नाही.

     नियमित उपासना करणारया भक्तांना देवीच्या मुखावर दररोज वेगवेगळ्या भावमुद्रांची,तेजाची प्रचीती येते.

     सुरुवातीला चैत्र शुद्ध पोर्णिमा सन १९८४ ला एका साध्या चौथऱ्यावर स्तापित झालेल्या देवीच्या स्थानाने आता भव्य स्वरूप प्राप्त केले आहे
copyright @ renuka mata vishwastha nidhi mandal
Powered by Sun Infosystem